Ad will apear here
Next
शिक्षण क्षेत्रात ‘आयओटी’चा उपयोग!


शिक्षण क्षेत्रात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, याविषयी पाहू या ‘इंटरनेट यत्र, तत्र, सर्वत्र’ या सदराच्या आजच्या भागात...
............
‘ज्या कुणाला काही तरी नवीन शिकायची इचछा आहे, त्या व्यक्तीला तिला सोयीस्कर असलेल्या ठिकाणी बसून ती गोष्ट सहज शिकता येत आहे...’

‘कम्प्युटर किंवा मोबाइलचा वापर करून जगभरातील शिक्षक आणि तज्ज्ञ यांच्याशी शिकणाऱ्या व्यक्तींना संवाद साधता येतो आहे...’

असा नुसता विचार केला, तरी किती छान वाटतं ना!

इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात ‘आयओटी’मुळे हे सगळे सहज साध्य होऊ शकते. त्याबद्दल थोडी माहिती घेऊ या.

शाळा व्यवस्थापन : 
शिक्षण क्षेत्रातील रोजची तांत्रिक कामे नियमितपणे पूर्ण करण्यामध्ये ‘आयओटी’ची खूप मदत होईल. त्यामुळे शाळेचे व्यवस्थापक आणि शिक्षक यांना शिकवण्यावर आणि गुणवत्तेवर लक्ष देण्यास सोपे जाईल. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांची उपस्थिती घेणे, निकालपत्रक आणि त्यांच्या इतर गोष्टींच्या नोंदी करणे ‘आयओटी’मुळे सहज शक्य होईल. त्यामुळे शिक्षकांचा बराच वेळ वाचेल आणि तो शैक्षणिक कामांसाठी वापरता येतो.

विद्यार्थ्यांची सुरक्षा : 
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’वर आधारित असलेल्या ओळखपत्रामुळे कर्मचाऱ्यांना, शिक्षक आणि विद्यार्थी, येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांनाच ‘आयओटी’ डिव्हाइसचा वापर करून ‘ट्रॅक’ करता येईल. यामुळे तिऱ्हाईत व्यक्ती शाळेच्या किंवा कॉलेजच्या आवारात उगाच येऊ शकणार नाही. शाळांच्या बसेसमध्ये जीपीएसची सुविधा असेल, तर बस ट्रॅक करता येईल आणि विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. 

डेटा संग्रहण आणि विश्लेषण :
कोणतीही वस्तू ट्रॅक करण्यासाठी विद्यार्थी रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) डिव्हाइस वापरू शकतात. बऱ्याच शाळा आता क्लाउडवर आधारित सॉफ्टवेअर्स आणि त्यानुसार स्वयंचलित डेटा विश्लेषणावर भर देतात. 

पाठ्यपुस्तकांमध्ये ‘आयओटी’
‘क्विक रिस्पॉन्स कोड’च्या (क्यूआर कोड) मदतीने अभ्यासाला पूरक माहिती सहज मिळू शकते. पाठ्यपुस्तकात क्यूआर कोड प्रसिद्ध करण्याचा प्रयोग ‘बालभारती’ने केला आहे. त्यामुळे ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच इतर विषयांची माहिती घेण्यात रस वाढू शकतो. ‘क्यूआर कोड रीडर’ असेल तर स्मार्टफोनचा वापर करून त्यातून बरीच माहिती मिळू शकते. विविध प्रकारच्या स्मार्ट सिस्टिम्स म्हणजे स्मार्ट बोर्ड, स्मार्ट बुक्स, स्मार्ट लॅब्स अशा सगळ्याचा वापरून व्यवस्थापनात बराच बदल घडवून आणू शकतो.

या क्षेत्रात ‘आयओटी’चा सगळ्यात मोठा फायदा अपंग/दुर्बल विद्यार्थ्यांच्या शिक्षणात होणार आहे. ‘स्मार्ट शिक्षण’ असे म्हणतो, तेव्हा त्यामध्ये वेगवेगळ्या डिजिटल डिव्हाइसचा वापर केला जातो. त्यातून अधिक कार्यक्षम आणि बिनचूक शिक्षण प्रक्रिया विकसित करता येते.

‘आयओटी’च्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि या यंत्रणांत चांगला ताळमेळ तयार होतो. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने माहिती आत्मसात करणे शक्य होते.
विद्यार्थी अभ्यास कसा करत आहेत, याचाही मागोवा ‘आयओटी’द्वारे घेता येऊ शकतो. एखादी असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला किती वेळ आवश्यक असतो आणि त्याला प्रत्यक्षात किती वेळ लागत आहे, याबद्दल माहिती घेता येईल. याचा वापर करून शिक्षकांना त्यांची कार्यपद्धती योग्य आहे की नाही, हे समजून घेण्यास मदत होऊ शकते. कोणत्या विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शनाची गरज आहे, कशात ते कच्चे आहेत, हेदेखील सहज समजेल.

आधुनिक पद्धतीने तयार केले गेलेले ई-लर्निंगचे वेगवेगळे भाग/रेकॉर्डिंग विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या वेगाने समजून घेणे सोपे पडते. त्यामुळे त्यांना मिळणारे समाधान आणि अभ्यासात येणारी गती यामध्ये खूप फरक पडतो. या व्यतिरिक्त क्लाउड तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील वेगवेळ्या भागातील शिक्षकांना एकमेकांशी संवाद साधणे सोपे होते. 

शिक्षण क्षेत्रात ‘आयओटी’चा वापर केल्याने केवळ ते स्वस्त होण्यासच नव्हे, तर शिक्षणाचे मूल्य आणि गुणवत्ता वाढण्यासही खूप मदत होईल. ‘आयओटी’ चा वापर करून या क्षेत्रात खर्चाचे व्यवस्थापन, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, व्यावसायिक विकास या गोष्टी साध्य होऊ शकतील.

शिक्षण क्षेत्रात नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा जितका वापर होईल, तितकी तिथे शिकत असलेल्या मुलांना, शिक्षकांना आणि इतर कर्मचाऱ्यांना त्याची माहिती होईल. याचा वापर मुले पुढे जाऊन बाकीच्या क्षेत्रात करू शकतील.

या क्षेत्रात फायदे जरी बरेच असले तरी बऱ्याच वेळा पूर्ण माहिती नसल्याने किंवा परंपरागत आलेल्या पद्धतींचा वापर करून नवीन गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत. नवीन तंत्रज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन या क्षेत्रात खूपच वेगळा आहे. शिक्षण क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याची मानसिकता अजून फारशी तयार झालेली नाही.

हे चित्र बदलण्यासाठी ‘आयओटी’च्या बाबतीत अगदी शाळेपासून विविध क्षेत्रातील शिक्षण पद्धतींमध्ये याविषयीची माहिती आणि त्याचा वापर समजावला गेला पाहिजे. शिक्षण क्षेत्रातील नावीन्यपूर्णतेचा कसा फायदा होऊ शकतो आणि त्याचा वापर कसा करता येईल, हे समजून घेणे आणि समजावून सांगणे आवश्यक आहे.

 
- अनुष्का शेंबेकर
ई-मेल : anushka19@gmail. com

(लेखिका माहिती-तंत्रज्ञान विषयातील इंजिनीअर असून, पुण्यातील ऑलिफाँट सोल्युशन्स या कंपनीच्या संस्थापक सीईओ आहेत. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत त्या १२हून अधिक वर्षे कार्यरत असून, या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

(‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे सदर दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZZHCF
Similar Posts
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आणि वाहने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे ऑटोमोबाइल अर्थात वाहन क्षेत्रात मोठे बदल होऊ लागले आहेत. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...
शेतीमध्येही ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’ तंत्रज्ञान शेती क्षेत्रातही उपयोगी ठरू शकते. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...
इंटरनेट - यत्र, तत्र, सर्वत्र! ‘इंटरनेट’ ही गोष्ट आज आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत चालली आहे. इंटरनेटमुळे दूरवरच्या माणसांमधील संवाद सुलभ झाला. आता या इंटरनेटमुळे वेगवेगळी साधने, यंत्रेही एकमेकांशी संवाद साधू लागली आहेत. त्यालाच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ असे म्हणतात. त्यामुळे जवळपास प्रत्येक क्षेत्रातील कामे सोपी होणार
लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये ‘आयओटी’चा वापर लघू व मध्यम उद्योग अर्थात ‘एसएमई’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, यावर एक नजर... ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’च्या आजच्या भागात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language